Site icon Sarkari Shikshan – सरकारी शिक्षण

Udise Plus मध्ये विद्यार्थ्यांचे MBU – Mandatory Biometric Update आणि आधार व्हॅलिडेशन बाबत

राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून सुमारे २,०५,६०३८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी १,९२.३५१६९ विद्यार्थ्यांची नावे आधार प्राधिकरणाकडील माहितीशी जुळत असल्याने वैध ठरलेले आहेत. सदरचे प्रमाण हे ९३.५५% इतके आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. विद्याध्यर्थ्यांची आधार पडताळणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गटसाधन केंद्रावर २ असे एकूण ८१६ आधार संच उपलब्ध करुन दिलेले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्यासाठी योग्य ते नियोजन क्षेत्रीयस्तरावर करुन कार्यवाही करणेत यावी.

MBU – Mandatory Biometric Update

UIDAI व शिक्षण मंत्रालयाच्या सूचना-

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्यामार्फत बालकांच्या ५ ते ७ व १५ ते १७ या वयोगटातील MBU आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असल्याने देशातील सर्व शाळांना आवाहन केले आहे. यासाठी UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना विशेष शिबिरे आयोजित करण्याची सूचना केली आहे. याकरिता UIDAI व शिक्षण मंत्रालयाने संयुक्त उपक्रम राबवत यूनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE) या पलॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटची स्थिती उपलब्ध करून दिली आहे. सदर युडायस प्रणालीमध्ये विद्यार्थाची आधार प्रमाणीत माहिती यापुढे बंधनकारक असून त्याचा उपयोग विविध योजना व विद्यार्थी लाभांशी जोडण्यात येणार आहे.

शासनाचे परिपत्रक  येथे पहा 

हे पण वाचा – १) सन 2025-26 च्या संच मान्यते बाबतच्या सूचना येथे पहा 

हे पण वाचा – २) विद्यार्थ्यांचे Aadhar नोंदणी आणि Aadhar Update चे काम पूर्ण करण्या बाबतयेथे पहा 

स्पर्धा परीक्षांमध्ये अडचणी टाळण्यासाठी आधार अपडेट-

तसेच NEET, JEE, CUET यांसारख्या स्पर्धा व विद्यापीठ परीक्षांमध्ये नोंदणी करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अडचणी येऊ नयेत याकरिता वेळेत बायोमेट्रिक अपडेट करणे महत्वाचे असल्याचे UIDAI ने स्पष्ट केले आहे. आधार अद्ययावत करणे बाबतची प्रक्रीया शाळांमधून शिबिरांच्या माध्यमातून अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते.

UDISE Plus पोर्टलवरील माहिती-

UDISE PLUS पोर्टलवरील माहितीचा आढावा घेतला असता एकूण नोंदणीकृत विद्याम्यपिकी ५ ते ७या वयोगटातील ३८,९२,२३२ आणि १५ ते १७ वयोगटातील २३,७७,७६८ आगी एकूण ६२,७०,००० एवढया विद्याचे MBLU (Mandetory Biometric Update) संदर्भातील काम प्रलंबित आहे. प्रस्तुत प्रलंबित काम दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत पूर्ण करुन घेण्याच्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

शाळांनी करावयाच्या प्राथमिक कार्यवाही-

सर्व प्रथम सर्व शाळांनी UDISE Plus या पोर्टलवरुन आपल्या शाळेतील MBU (Mandetory Biometric Update) करीता प्रलंबित विद्याथ्यांची यादी तयार करुन ठेवावी, सदर माहिती तयार करण्याची कार्यादती सोबत जोडण्यात आलेली आहे.

तालुका व जिल्हास्तरीय जबाबदाऱ्या-

शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी पोस्ट विभागाचे विभागीय अधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन प्राधान्याने MBU (Mandetory Biometric Update) बाबतचे कामकाज पूर्ण करुन घ्यावयाचे  व MBU (Mandetory Biometric Update) काम संपल्यानंतर कॅम्पच्या शेवटी शाळेतील आधार व्हॅलिडेशन आणि मिसमॅचबाबतचे काम पूर्ण करुन घ्यावयाचे आहे.

भारतीय पोस्ट विभागामार्फत शिक्षण विभागाकडील MBU (Mandetory Biometric Update) बाबत मोठ्या प्रमाणात प्रलंबित असणाऱ्या शाळांकरीता आधार नोंदणी संघ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतचे कॅम्प मोडवर नियोजन तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी शाळानिहाय प्रलंबित विद्यार्थी संखेचा आढावा घेऊन करावयाचे आहे. यामध्ये प्राधान्याने तालुक्यातील सर्वाधिक प्रलंबित विद्यार्थी संखेच्या शाळेत सदरचा MBU (Mandetory Biometric Update) कॅम्प आयोजन करणेत यावी. MBU (Mandetory Biometric Update) नियोजन करण्यात आल्यानंतर त्याप्रमाणे कामकाज सुरु असल्याची खात्री यादृच्छिक फदतीने शाळांना भेटी देऊन करण्यात यावे तसेच प्रस्तुत कामकाजाकरीता काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्वरीत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. तालुकास्तरावरुन युडायस प्लस पोर्टलवर लॉगिनकरून दैनंदिन माहितीचा आढावा घेण्यात यावा व आवश्यकतेनुसार सर्व शाळा आणि आधार नोंदणी संच ऑपरेटर यांना निर्देश देण्यात यावेत.

वरील कामकाज पूर्ण करण्याकरीता उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येऊन त्यांचा संपर्क क्रमांक पोस्ट विभाग व संचालनालयास कळविण्यात यावा जेणेकरुन जिल्ह्यातील MBU (Mandetory Biometric Update) बाबतच्या कामकाजाचा आढावा घेणे सुलभ होऊ शकेल.

वरील कामकाजाकरीता शाळांसाठी खालील सूचना –

वरील सर्व मुद्यांच्या अनुषंगाने भारतीय पोस्ट विभाग आणि शिक्षण विभागाकडील आधार नोंदणी संच यांचे संयुक्तपणे नियोजन करुन राज्यातील सर्व शाळांमधील MBU (Mandetory Biometric Update) आणि आधार व्हॅलिडेशन बाबतचे काम विहित कालावधीमध्ये पूर्ण करुन घेण्यात यावे.

Exit mobile version