Site icon Sarkari Shikshan – सरकारी शिक्षण

विद्यार्थ्यांचे Aadhar नोंदणी आणि Aadhar Update चे काम पूर्ण करण्या बाबत

राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण प्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत (MPSP) गटसाधन केंद्रांवर (CRC) प्रत्येकी २ प्रमाणे मिळून एकूण ८१६ आधार नोंदणी संच (Aadhar Enrollment Kits) उपलब्ध करून देण्यात आले होते. या संचांचा वापर करून विद्यार्थ्यांची आधार नोंदणी तसेच अद्ययावतीकरणाची कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. तरीदेखील अनेक विद्यार्थी अजूनही आधार नोंदणीकृत नाहीत, तसेच सरल प्रणालीमध्ये आधार क्रमांक व माहितीतील विसंगती (mismatch) मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांची नावे अजूनही Draft Box मध्ये प्रलंबित असल्याचे दिसून येते. त्यामुळे, सध्या उपलब्ध असलेल्या सर्व कार्यरत आधार नोंदणी संचांचा योग्य वापर करून प्रलंबित कामकाज तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी खालील सूचना दिल्या जात आहेत.

Aadhar Validation

1. शाळानिहाय माहिती गोळा करणे

प्रत्येक शाळेकडून खालील संख्यात्मक माहिती मिळवावी –

  • आधार नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या
  • आधारमध्ये दुरुस्ती आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

मिळालेल्या माहितीच्या आधारे कामाची व्याप्ती निश्चित करून आधार नोंदणी केंद्र ठरवावे.

2. केंद्र निश्चित करताना विचारात घेण्याच्या बाबी

  • संबंधित शाळेत आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध असणे
  • विद्यार्थ्यांना पोहोचण्यासाठी योग्य रस्ता असणे
  • शाळेच्या परिसरात स्थिर इंटरनेट नेटवर्क असणे

वरील बाबींचा विचार करून केंद्राची निवड करावी.

3. विद्यार्थ्यांचे केंद्राशी संलग्निकरण करणे:

ठरवलेल्या केंद्रावर नजीकच्या कोणत्या शाळांमधील विद्यार्थी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणासाठी येणार आहेत हे स्पष्टपणे निश्चित करणे आवश्यक आहे.

4.शासनच्या शिष्यवृत्ती व इतर योजना लाभ

शिक्षण विभागाकडील सर्व शिष्यवृत्ती व इतर लाभ योजना प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आधार नोंदणीची कार्यवाही प्रलंबित राहिल्यास विद्यार्थी योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही विद्यार्थी लाभापासून वगळला जाणार नाही, याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.

शासन परिपत्रक वाचण्यासाठी Click Here 

आधार नोंदणी व अद्ययावतीकरण – पुढील सूचना

  1. आधी नमूद केलेल्या मुद्दे (१ ते ३) यानुसार तात्काळ आणि योग्य कार्यवाही करून सर्व प्रलंबित तसेच दुरुस्ती आवश्यक असलेली आधाराशी संबंधित कामं पूर्ण करणं बंधनकारक आहे.
  2. संचमान्यता ही फक्त आधार-वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे होणार असल्यामुळे, प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील mis-match, invalid व आधार नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढणे आवश्यक आहे.
  3. गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या तालुक्यातील सर्व प्रलंबित शाळांचा आढावा घ्यावा आणि उपलब्ध असलेल्या आधार नोंदणी संचांचा योग्य व अचूक नियोजन करून वापर करावा. केंद्रनिहाय नियोजनास प्राधान्य द्यावे. जर एखाद्या शाळेत प्रलंबित विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल तर त्या शाळेसाठी स्वतंत्र संच उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे.
  4. प्रत्येक गटशिक्षणाधिकारी यांनी दररोज तालुक्यात कार्यरत आधार नोंदणी संच ऑपरेटरकडून विद्यार्थ्यांची नोंदणी व अद्ययावतीकरणाचा आढावा घ्यावा. तसेच आवश्यक असल्यास संबंधित ऑपरेटरकडून अपूर्ण राहिलेली सर्व कामं पूर्ण करून घ्यावीत.
  5. तालुक्यातील उपलब्ध आधार नोंदणी संचांपैकी काही संच किरकोळ कारणांमुळे नादुरुस्त झाले असल्यास, ते संच तातडीने दुरुस्त करून पुन्हा कार्यरत करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक निधीचा वापर करावा.
  6. शासनाने तालुकानिहाय आधार ऑपरेटरची यादी व संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिली आहे. त्या यादीप्रमाणे प्रलंबित व दुरुस्तीची कामं असलेल्या शाळांसाठी पुढील १५ दिवसांचे नियोजन अचूकपणे करणे आवश्यक आहे. तसेच या संदर्भात संबंधित शाळा व पालक यांनाही योग्य माहिती देणे गटशिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
  7. ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण पूर्ण होणं बंधनकारक आहे. मुख्याध्यापकांनी स्वतः खात्री करून प्रत्येक विद्यार्थी सरल प्रणालीमध्ये योग्यप्रकारे नोंदणीकृत आहे, हे सुनिश्चित करावं.
  8. विद्यार्थी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणासंदर्भातील मार्गदर्शक सूचना व आदेश संचालनालय स्तरावरून वेळोवेळी जारी केले जातील. या आदेशांची अंमलबजावणी करणं हे सर्व बक्षेत्रीय अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे.

सरल Drop Box बाबत सूचना (Student Portal)

  1. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये Drop Box मध्ये दिसणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळेत प्रवेशित (attach) करण्याची प्रक्रिया त्वरित पूर्ण करणं आवश्यक आहे.
  2. सध्या सरल प्रणालीतील School Portal वरील Drop Box मध्ये अजूनही १३.८४ लाख विद्यार्थी प्रलंबित असल्याचं आढळतं. सोबत जिल्हानिहाय विवरण तक्ता जोडला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने तातडीने कार्यवाही करावी.
  3. Drop Box मध्ये दाखवले गेलेले प्रलंबित विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत प्रवेशित करणे अनिवार्य आहे.
    यामुळे प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल आणि शाळेच्या नोंदीतील सर्व माहिती योग्य व अद्ययावत राहील.

५. शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय स्थितीचा आढावा घेऊन, ज्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रलंबित आहेत त्या शाळांना व तालुक्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत. तसेच वेळोवेळी पुनरावलोकन करून Drop Box मध्ये दिसणारे सर्व विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जातील यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.

६. Drop Box मधील विद्यार्थ्यांची नोंद शाळेत इन केल्यानंतरच ती माहिती SARAL प्रणालीमध्ये कायमस्वरूपी जतन होते. यामुळे शाळेला कोणते विद्यार्थी अजून प्रलंबित आहेत हे स्पष्टपणे दिसते आणि आवश्यक असल्यास त्याबाबत पुढील कार्यवाही करता येते.

७. वरिष्ठ कार्यालयालाही विद्यार्थ्यांच्या हस्तांतरण प्रक्रियेचा आढावा घेता येतो. Drop Box च्या माध्यमातून मागील शाळेने विद्यार्थ्याची नोंद सोडली आहे की नाही आणि नवीन शाळेने प्रवेश मंजूर केला आहे की नाही हे सहज तपासता येते.


क) APAAR ID (Automated Permanent Academic Account Registry) बाबत

  1. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार, इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना UDISE प्रणालीचा वापर करून APAAR ID (१२ अंकी एकमेव ओळख क्रमांक) तयार करून देणे बंधनकारक आहे.
  2. या क्रमांकामुळे विद्यार्थ्याला कोणत्याही शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठात कायमस्वरूपी एकच ओळख मिळेल. APAAR ID मुळे विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक नोंदी, प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतात. एखाद्या विद्यार्थ्याने शाळा बदलली तर ही सर्व माहिती आपोआप नवीन शाळेला हस्तांतरित होते.
  3. APAAR ID हा प्रत्येकासाठी unique असल्याने विद्यार्थ्यांची duplicate नोंद टाळली जाते. तसेच याच्या मदतीने शिष्यवृत्ती आणि शासनाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थ्यांची पात्रता सहज तपासता येते.
  4. राज्यातील APAAR ID तयार करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला असता, अजूनही सुमारे २०% विद्यार्थ्यांचे ID तयार झालेले नाहीत. हा क्रमांक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी या कामाला प्राधान्य द्यावे आणि प्रलंबित विद्यार्थ्यांचे APAAR ID ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून घ्यावेत.

वरील सर्व कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने सर्व शिक्षणाधिकारी यांनी योग्य ते नियोजन करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. अशी सूचना शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्या कडून देण्यात आलेली आहे.

Exit mobile version