सन 2025-26 च्या संच मान्यते बाबतच्या सूचना महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या अधिकृत परिपत्रकानुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत सूचना दिल्या आहेत.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून शाळांना एक महत्त्वाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी “सरल पोर्टल” आणि “यू-डायस प्लस पोर्टल” या दोन्ही ठिकाणी स्वतंत्रपणे माहिती भरावी लागत होती. मात्र आता ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून सर्व आवश्यक विद्यार्थी माहिती फक्त यू-डायस प्लस पोर्टलवरच नोंदवावी लागेल.
30 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुढे संच मान्यतेसाठी लागणारी माहिती देखील केवळ यू-डायस प्लस पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोंदींवर आधारित राहील.
संच मान्यता प्रक्रियेबाबत महत्त्वाचे मुद्दे
1. विद्यार्थी संख्या विचारात घेणे
संच मान्यता करताना 30 सप्टेंबर 2025 अखेर पटावर असलेल्या आधार-वैध विद्यार्थी संख्येवरच विचार केला जाईल.
या तारखेनंतर आधार पडताळणी पूर्ण केलेले विद्यार्थी किंवा नव्याने झालेल्या नोंदी संच मान्यता किंवा दुरुस्ती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
2. विद्यार्थी वयानुसार प्रवेश
संच मान्यतेच्या वेळी 30 सप्टेंबर 2025 अखेर पटावर असलेला प्रत्येक विद्यार्थी योग्य वयानुसार संबंधित वर्गात दाखल झाला आहे याची खात्री करून घेणे बंधनकारक आहे.
3. अधिकाऱ्यांची जबाबदारी
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील सर्व विद्यार्थी नोंदींची आधार पडताळणी ३० सप्टेंबर २०२५ किंवा त्याआधीच पूर्ण करावी. या कामासाठी अधिकचा कालावधी दिला जाणार नाही, त्यामुळे वेळेतच प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना ही सूचना तातडीने कळवावी.
महत्त्वाचे मुद्दे असे आहेत:
- एकाच पोर्टलवर नोंदणीची सुविधा
यापुढे “सरल पोर्टल” आणि “U-DISE Plus पोर्टल” यावर वेगवेगळी माहिती भरण्याऐवजी, फक्त U-DISE Plus पोर्टलवर माहिती भरायची आहे.
- संच मान्यता Udise Plus पोर्टलवरील माहितीच्या आधारे होईल.
संच मान्यतेसाठी महत्त्वाची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची Aadhar Valid विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे. 30 सप्टेंबर 2025 नंतर Aadhar valid झालेले तसेच नवीन विदयार्थी नोंदणी संख्या किंवा आधार पडताळणी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
- वयानुसार वर्गात प्रवेश.
तसेच प्रत्येक विद्यार्थी वयानुसार वर्गात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
30 सप्टेंबर 2025 पर्यंत पटावरील विद्यार्थी योग्य वयोगटात असणे बंधनकारक आहे.
शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची जबाबदारीत्यांनी शाळांमधील विद्यार्थी नोंदींची आधार पडताळणी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावी.या साठी अतिरिक्त दिला जाणार नाही.
अशी सूचना महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या अधिकृत परिपत्रकानुसार दिल्या गेल्या आहेत.