पंचायत समिती म्हणजे काय?
पंचायत समिती ही तालुका पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. अनेक गावे मिळून तयार झालेल्या तालुक्यातील विकासकामांचे समन्वयित व सुरळीत नियोजन करणे, ग्रामपंचायतींना आर्थिक–तांत्रिक मदत देणे, आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे ही पंचायत समितीची जबाबदारी असते. तसेच महाराष्ट्रात एकूण 35 जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये सुमारे 351 पंचायत समित्या (तालुका पातळीवर) कार्यरत आहेत. म्हणजेच प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पंचायत समिती स्थापलेली आहे.
पंचायत समितीची प्रमुख कामे व विभाग
१) ग्रामपंचायत विभाग
तालुक्यातील ग्रामपंचायतींना निधी वाटप करणे. या निधीद्वारे रस्ते, गटारे, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छतागृहे इत्यादी कामे करण्यात येतात.
२) शिक्षण विभाग
प्राथमिक शाळा व अंगणवाडींचे व्यवस्थापन व देखरेख.
३) आरोग्य विभाग
प्राथमिक आरोग्य सेवा, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमधील सोयी सुविधांची उपलब्धता व देखभाल.
४) पाणीपुरवठा विभाग
ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व संबंधित योजनांची अंमलबजावणी.
५) सामाजिक कल्याण विभाग
विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती योजना, महिला व बालकल्याण योजना, महिला कामगार योजना, ग्रामीण भागातील रोजगार हमी योजना इत्यादींची अंमलबजावणी.
६) कृषी विभाग
शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्र, अवजारे, अनुदान, बियाणे व खत याबद्दल मार्गदर्शन; कृषी योजनांची माहिती पुरवणे.
७) बांधकाम विभाग
रस्ते, पूल, शासकीय इमारती, शाळा व ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम व देखभाल.
पंचायत समितीचा कारभार कोण पाहतो?
पंचायत समितीचा कारभार सभापती (कार्यकाळ 5 वर्ष) पाहतात. त्यांना उपसभापती मदत करतात. प्रशासनिक पातळीवर गटविकास अधिकारी (BDO) कामकाज पाहतात.
नगर पालिका म्हणजे काय?
नगर पालिका ही महाराष्ट्र शासनाद्वारे स्थापन केलेली शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहरे व नगर क्षेत्रातील लोकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि शहराचा नियोजनबद्ध विकास करणे ही नगर पालिकेची जबाबदारी आहे.
नगर पालिकेची मुख्य कामे
- शिक्षण: शहरी भागातील प्राथमिक शिक्षण व शाळा व्यवस्थापन.
- पाणीपुरवठा व जलनिस्सारण: स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व जलनिस्सारण व्यवस्था.
- बांधकाम व रस्ते: नवे रस्ते तयार करणे, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती.
- स्वच्छता व आरोग्य: शहर स्वच्छ ठेवणे, आरोग्य सेवा उपलब्ध करणे.
- बाग व उद्याने: उद्याने, बाजारपेठा व सार्वजनिक स्थळांची देखभाल.
- रुग्णालये: नगर पातळीवरील रुग्णालये व दवाखान्यांचे व्यवस्थापन.
महाराष्ट्रात एकूण किती नगर पालिका आहेत?
महाराष्ट्रात सध्या सुमारे 345 नगर पालिका कार्यरत आहेत. याशिवाय मोठ्या शहरांसाठी महापालिका (Municipal Corporations) असतात.
नगर पालिकेचा कारभार कोण पाहतो?
नगर पालिकेचे नेतृत्व नगराध्यक्ष करतात (सदस्यांमधून निवड). प्रशासनिक पातळीवर मुख्याधिकारी (Chief Officer) नेमलेले असतात.
पंचायत समिती व नगर पालिका यांच्यातील प्रमुख फरक
मुद्दा | पंचायत समिती | नगर पालिका |
---|---|---|
कार्यक्षेत्र | ग्रामीण भाग (तालुका) | शहरी भाग (शहरे) |
लोकसंख्या आधार | ग्रामीण गावे, शेतीप्रधान क्षेत्र | साधारण 25000+ लोकसंख्या असलेली शहरे |
प्रमुख अधिकारी | सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी | नगराध्यक्ष, मुख्याधिकारी |
मुख्य कामे | ग्रामीण विकास, शेती, शाळा, आरोग्य | पाणी, रस्ते, स्वच्छता, कर संकलन |
सदस्य निवड | तालुक्यातील मतदारसंघातून | शहरातील प्रभागातून |
संख्या (महाराष्ट्र) | 351 पंचायत समित्या | 345 नगर पालिका |
थोडक्यात: पंचायत समिती ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत असते, तर नगर पालिका शहरी भागातील सोयी सुविधांसाठी काम करते. दोन्ही संस्थांचे उद्दिष्ट एकच सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावणे.
FAQ:
Que. महाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत कोणती आहे?
Ans: महाराष्ट्रातील पहिली नगर पंचायत पनवेल येथे स्थापन करण्यात आली.
Que. महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती?
Ans. महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत रहिमतपूर ह्या गावात स्थापन करण्यात आली आणि रहीमपूर हे गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे.
Que.ग्रामसेवक म्हणजे कोण?
Ans. ग्रामसेवक हा शासनाद्वारे नियुक्त कर्मचारी असतो. त्याच्याकडे गावाचा विकास, शासनाद्वारे ग्रामस्थांना मिळणाऱ्या योजनाची अंमलबजावणी करणे हि कामे व गावातील इतर कामे असतात.
तर हा लेख तुम्हाला वाचायला कसा वाटला आम्हाला comment द्वारे किव्वा आम्हाला contact करून नक्की सुचवा, तसेच ह्या Article मध्ये तुमच्या सुझावानुसार कोणते मुद्दे घ्यायला हवे होते ह्या बद्दल नक्की कळवा.