जळगाव मधील खाजगी माध्यमिक शाळांना मिळणार २०% वाढीव अनुदान

अनुदानाबाबत शासन संदर्भ :

१. शासन निर्णय क्र. माशाअ/२०२२/प्र.क्र.२७५/एसएम-४, दि.०६/०२/२०२३

२. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या व्ही.सी. मधील सूचना दि.२४/०३/२०२३

३. मा. शिक्षण संचालक (प्रो) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र. प्रशिसं/खाप्रशा/अंदाज-५११ अनु.वि.८२०२२-२३/१५४१ दि.२२ फेब्रुवारी २०२३. (२० टक्के व वाढीव २० टक्के).

४. शासन निर्णय क्र. प्रामाशाअ/२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि.२५/०८/२०२५

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपली शाळा यापूवी शाळा शासन निर्णय दि.०६ फेब्रुवारी २०२३ नुसार २०,४०,६० टक्के अनुदानास पात्र ठरलेली असून, संदर्भ क्र.४ अन्वये बाढीव २० टक्के अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली असल्याने त्यासाठी सदर शासन निर्णयात खालील प्रमाणे तपासणी सुची निश्चित करण्यात आलेली असून अघोषित पात्र शाळेस २० टक्के व अशतः अनुदानित शाळेस वाढीव २० टक्के अनुदान आदेश वितरित करण्यासाठी खालील कागदपत्रासह प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावा.

sarkari shikshan

  1. सदरहू शाळेस अनुदानासाठी पात्र करण्यापूर्वी सदर शाळेचे वर्ग/तुकडी/अतिरिक्त शाखा मान्यते बाबतचे सर्व शासन आदेश सादर करावे.
  2. सदरहू शाळा शाळेस मान्यता दिलेल्या मुळ ठिकाणी सुरु आहे याचा पुरावा सादर करणे, तसेच शाळेचे स्थलांत्तर झालेले नसून त्यासंबंधी शासन मान्यतेचे आदेश सादर करावे. जर शाळा स्थलांतरित झाली असेल तर शासनाचे व उपसंचालक याचे आदेश जोडावे.
  3. सदर शाळेची २०२४-२५ ची संचमान्यता प्रस्तावासोबत सादर करावी.
  4. सदरहू शाळेस अनुदानास पात्र करण्यात आलेला वर्ग/तुकड्या/शाखा स्वंय अर्थसहाय्यीत तत्वावर सुरु नाहीत यांची माहिती सादर करावी.
  5. सदरहू शाळेस अनुदान पात्र शिक्षकांची कर्मचा-यांची आधारकार्ड सह वैयक्तीक मान्यता झालेली असून त्या बाबतचे आदेश व सरल प्रणालीत भरण्यात आलेली माहिती सादर करावी.
  6. सदरहू शाळेतील शिक्षक कर्मचा-यांच्या भरती संदर्भात आरक्षण धोरणाचे पालन करण्यात आलेले आहे. किंवा कसे याबाबत अद्यावत बिदुनामावली नोंदवही मावक यांनी तपासणी केलेली सादर करावी.
  7. सदर शाळा/तुकडीला यापूर्वी २०/४०/६० टक्के अनुदान सुरु असून शासन निर्णयातील अटी व शतीची पुर्तता केल्यानंतर त्या पुढील वाढीव २० टक्के अनुदान देण्यासाठी सर्व अनुदान आदेश सादर करावे. (कर्मचा-यांच्या नावानिशी दिलेले आदेश).
  8. संबंधित अनुदान घेत असलेल्या कर्मचा-यांचे शालार्थ आयडी आदेशाची प्रत. (जेव्हा पासुन देव असेल तेव्हापासून)
  9. सदरहू शाळेतील शिक्षक कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ठ झालेले आहेत/नाहीत याचा पुरावा सादर करावा.
  10. सदर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रीक अथवा चेहरा ओळख (Face Recogniaion) प्रणालीव्दारे नोदविण्यात आल्याची (मागील ०३ महिण्याची) प्रत व सदरहू शाळेतील विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोदविण्यात आलेली आहे. याचा पुरावा सादर करावा.
  11. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.११९/ एसडी-४, दि.१३ मे २०२५ नुसार शाळामधील विद्याची व विद्याध्यांच्या सुरक्षाविषय उपायोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याची माहिती पुराव्या सह सादर करावी.
  12. ज्या मूळ शिक्षक अथवा शिक्षकेत्तर कर्मचा-यांकरीता टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे त्याच मूळ शिक्षक अथवा शिक्षकेत्तर कर्मचा-याला टप्पा अनुदान अनुज्ञेय करण्यात आला आहे. सदर मुळ शिक्षक अथवा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पद राजीनामा, बदली, समायोजन, सेवानिवृत्ती इत्यादी कारणांमुळे रिक्त झाले असल्यास अशा पदांना टप्पा अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.
  13. माहे जुलै, २०२५ चे वेतन देयकाची सांक्षाकीत प्रत व माहिती अचूक व बरोबर असलेबाबत मुख्याध्यापक वांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र समवेत सादर करावे,
  14. सदर २० टक्के व वाढीव २० टक्के अनुदान प्रस्ताव एकत्रित दस्ताऐवजासह ०२ प्रतीत सादर करावा.

संपूर्पण परिपत्रक वाचण्यासाठी: Click Here

२० टक्के व अशतः अनुदानित शाळेस वाढीव २० टक्के अनुदान साठी लागणारी  Excel Sheet येथे पहा Click Here

हे पण वाचा : अंशतः अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने मिळणार अनुदान : Click Here 

अनुदाणा मिळविण्यासाठी महत्वाची  टिप :-

  • फाईल सादर करतांना शाळा/वर्ग तुकडी असे वेगवेळ्या प्रपत्रात सादर करणे आवश्यक आहे.
  • पस्ताव सादर करण्याचे स्वतंत्र प्रपत्र यासोबत देण्यात येत आहे.
  • (प्रपत्र-अ हे शाळा/वर्गासाठी ८ ते १०) (प्रपत्र-ब हे तुकडीसाठी ५ ते ७ व इतर स्वतत्र तुकडी साठी)
  • सदर प्रस्तावाची फाईल क्रमवार दिलेल्या चेकलिस्ट प्रमाणे पेजीग करुन सादर करावी.
  • प्रस्तावाची सॉफ्ट पेनड्राईव मध्ये ही व्ही टी टी सुरेख या फॉन्ट १६ मध्ये सादर करावे.
  • सदर प्रस्ताव प्रथम वाढीव २० टक्के अनुदानाचे खालील दिनांकास तालुकानिहाय माहितगार कर्मचा-यामार्फत समक्ष सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या कडेस कार्यालयीन वेळेत सादर करावे.
  • अमळनेर, भडगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा यांनी दिनांक ०८/०९/२०२५ वार सोमवार.
  • चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, जामनेर, रावेर यांनी दिनांक ०९/०९/२०२५ वार मंगळवार
  • भुसावळ, यावल, धरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर यांनी दिनांक १०/०९/२०२५ वार बुधवार
  • नव्याने २० टक्के घोषित होणा-या शाळांची यादी म.शिक्षण संचालक पुणे यांचेकडून प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका नंतर २ दिवसात सदर कराव.

असे परिपत्रक महाराष्ट्र शासन शिक्षणाधिकारी (माध्य) कार्यालय जिल्हा परिषद जळगाव यांच्या द्वारे काढण्यात आले आहे.

Leave a Comment