NMMS Online form कसे भरावे – NMMS form बद्दल संपूर्ण माहिती

जर तुम्हाला विचार पडला असेल की NMMS Online form कसे भरावे, तर हा लेख तुमच्यासाठी सिद्ध केलेला आहे. NMMS 2025-26 परीक्षा साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया थेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या संकेतस्थळावरून सुरु होते. आणि अनेक शिक्षक व पालक यांना एकच विचार सतावतो — NMMS Online form कसे भरावे? हाच तुमचा प्रश्न आम्ही सोप्या भाषेत, step-by-step सोडवणार आहोत. या पोस्ट मध्ये तुम्हाला अर्जासाठी लागणारी मुख्य माहिती, कागदपत्र, फॉर्म भरण्याची शेवटची तारखा आणि लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या टीपांबद्दल प्राथमिक ओळख करून मिळेल.

Table of Contents

NMMS Online form कसे भरावे
NMMS Online form कसे भरावे
पुढे या लेखात आपण पाहणार आहोत की NMMS Online form कसे भरावे — NMMS ऑनलाईन पोर्टलवर लॉगिन कसे करावे, कोणती माहिती समोर ठेवावी, फोटो व signature कसे स्कॅन करावेत, शुल्क कसे भरावे आणि प्रवेशपत्र डाउनलोड कसे करायचे. म्हणून हा लेख पूर्ण वाचणे गरजेचे आहे. तसेच पुढील माहिती नोट करत घ्या आणि तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांशी जुळवून घ्या. लक्षात ठेवा — प्रथम पायरी म्हणजे हे समजून घेणे: NMMS Online form कसे भरावे म्हणजे केवळ एक फॉर्म भरण्याची प्रक्रिया नाही — ते तुमच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य मजबूत करणारी महत्वपूर्ण पाऊल आहे.

संक्षेप — NMMS Online form कसे भरावे

NMMS 2025-26 ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरवात दि.12 सप्टेंबर 2025 पासून NMMS च्या  Official Website सुरु होत आहे. तसेच NMMS  सन 2025-26 ची परीक्षा 21 डिसेंबर 2025 ला होण्याची शक्यता आहे. शाळावाल्यानी विद्यार्थ्याचा अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (mscepune.in, mscenmms.in) पुढे दिलेल्या निर्देशांचे अनुसरण करून सदर फॉर्म भरता येईल.

विद्यार्थ्याचा NMMS Online form भरण्यापूर्वी हे काम करावे.

1. आवश्यक माहिती आणि दस्तऐवज एकत्र करा

सगळ्यात आधी पुढील माहिती तयार ठेवा: विद्यार्थीचा आधार, बँक डिटेल्स. शाळेतील जनरल रजिस्टर वरील रेकॉर्ड (UDISE/PEN जर लागू असेल), पालकांचे उत्पन्न दाखला (2024-25), विद्यार्थीचा पासपोर्ट साईझ फोटो (scan) विद्यार्थीची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापक फोटो आणि Signatur (Scan करुण Resize करुण ठेवा), तसेच जातीचे प्रमाणपत्र  आणि विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र इ.माहिती समोर ठेवावी.

2. अधिकृत संकेतस्थळावर School Registration

शाळा/कनिष्ठ महाविद्यालयासाठी यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे संकेतस्थळा वरून  mscepune.in किंवा mscenmms.in वर शाळा Registration पूर्ण करुण घ्यावे.

3. ऑनलाईन फॉर्म भरणे

फॉर्ममध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती (नाव, DOB, वर्ग), शाळेची माहिती, पालकाचे उत्पन्न व इतर आवश्यक माहिती जनरल रजिस्टर नुसार भरा. चुकीची माहिती टाळा — कारण प्रवेशपत्र मिळाल्यानंतर दुरुस्ती करणे अवघड आहे.

4. फोटो व स्वाक्षरी अपलोड करा

Passport-size फोटो (required size: जवळजवळ 200KB) आणि विद्यार्थीची स्वाक्षरी अपलोड करा. स्कॅन केलेला Passport-size फोटो क्लियर आणि नवीन असावा.

5. शुल्क भरणे

ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्याआधी संबंधित फीस भरा — नियमित, विलंब किंवा अतिविलंब प्रमाणे शुल्क बदलते. भरण्यासाठी Netbanking / UPI / SBI Challan वापरता येतात. पेमेंटची पावती जतन ठेवा.

6. फॉर्म सबमिट आणि प्रिंट

सर्व तपासुन सबमिट करा. सबमिशन नंतर प्रिंट काढून शाळेत जतन करा. प्रवेशपत्र परीक्षा सुरू होण्यापूर्वी शाळाच्या login मधून उपलब्ध केले जाईल.

NMMS Form भरण्यासाठी महत्त्वाच्या तारखा व शुल्क

क्र. घटना तारीख / माहिती
1 ऑनलाईन फॉर्म उपलब्ध १२ सप्टेंबर २०२५
2 सदर फॉर्म अंतिम तारीख (नियमित) ११ ऑक्टोबर २०२५
3 विलंब शुल्क काळ १२ ऑक्टोबर — २१ ऑक्टोबर २०२५
4 अतिविलंब शुल्क काळ २२ ऑक्टोबर — ३० ऑक्टोबर २०२५
5 परीक्षा दिनांक २१ डिसेंबर २०२५ (रविवार)
प्रकार कालावधी शुल्क (रु.)
नियमित 12/09/2025 ते 11/10/2025 120/-
विलंब 12/10/2025 ते 21/10/2025 240/-
अतिविलंब 22/10/2025 ते 30/10/2025 360/- (किंवा 480/- संस्था जबाबदार असल्यास)

NMMS Online form साठी पात्रता व आवश्यक Documents—

  • महाराष्ट्रातील शासकीय/अनुदानित/स्थानिक संस्थेतील इ. ८ वीतील विद्यार्थी.
  • पालकांचे एकत्रित सन २०२४-२५ मध्ये वार्षिक उत्पन्न ₹3,50,000 पेक्षा कमी असावे.
  • इ.7 वी मध्ये General विद्यार्थी साठी  55% पास; SC/ST साठी 50% पास आवश्यक.

आवश्यक दस्तऐवज (Scan Copies)

  • विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईझ फोटो
  • विद्यार्थीची स्वाक्षरी
  • पालकांचे उत्पन्नाचा दाखला (2024-25)
  • जात प्रमाणपत्र (जर लागू असेल)
  • दिव्यांगत्व प्रमाणपत्र (जर लागू असेल)

टीप: शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व प्रमाणपत्रे जतन करावीत — परिषदेच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरल्यास उत्तरदायित्व शाळेवर येऊ शकते.

Status कसे तपासायचे — NMMS Online form कसे भरावे

फॉर्म सबमिट केल्यानंतर शाळा लॉगिनमधून अर्जांची यादी आणि पेमेंट स्टेटस तपासा. प्रवेशपत्र काही दिवस आधी शाळा-लॉगिनवर उपलब्ध होतील  — त्यानंतर प्रवेशपत्रची प्रिंट काढून मुख्याध्यापक यांनी सत्याकृत करुण ते प्रवेशपत्र विद्यार्थ्याला द्यावे.

प्रवेशपत्र आणि परीक्षा केंद्र

प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्र, ओळखपत्र क्रमांक व इतर सूचना असतात. प्रवेशपत्रात चुकीची माहिती आढळल्यास त्वरित परिषदाशी संपर्क करा — प्रवेशपत्र मिळाल्यानंतर बदल शक्य नाहीत.

NMMS परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला मिळणारे फायदे —

  • शिष्यवृत्ती रक्कम: उत्तीर्ण  झालेल्या विद्यार्थीला इ.9 ते इ.12 पर्यंत दरमहिना ₹1,000 (वार्षिक ₹12,000) शिष्यवृत्ती दिली जाते.
  • शैक्षणिक संधी: आर्थिक अडचणी असलेल्या गुणवान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत.

महत्वाच्या सूचना-

  • अचूक माहिती: ऑनलाईन फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती प्रमाणपत्रांसह सुसंगत असावी — चुकीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो.
  • प्रत्येक शाळेची जबाबदारी: प्रवेशपत्रावर माहिती पडताळण्याची पूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे.

NMMS FAQs —

प्रश्न 1: NMMS साठी अर्ज कोण करू शकतो?

उत्तर: महाराष्ट्रातील सरकारी/अनुदानित शाळांमध्ये इ.8 मध्ये शिक्षण घेत आणि पात्रता निकष पूर्ण करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

प्रश्न 2: फॉर्म भरताना फोटो व स्वाक्षरी चुकली तर काय करावे?

उत्तर: फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व फायली तपासा. प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळा-लॉगिनवर Edit करा; प्रवेशपत्र नंतर दुरुस्ती शक्य नाही.

प्रश्न 3:NMMS चे प्रवेशपत्र कधी उपलब्ध होणार?

उत्तर: परिषदेने निर्देश दिलेले वेळापत्रकानुसार परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे 10 दिवस आधी शाळा-लॉगिनवर प्रवेशपत्र उपलब्ध होतील.

प्रश्न 4: NMMS परीक्षा मधील पात्रता गुण किती आहे?

उत्तर: दोन्ही पेपर मिळून सामान्य विद्यार्थ्यांसाठी 40% आवश्यक, SC/ST व दिव्यांगांसाठी 32% आवश्यक आहे.

अधिक मदतीसाठी शाळेतील प्रमुख/शिक्षण अधिकारी यांचा सल्ला घ्या. Article created to help schools & parents — please verify final dates on official NMMS Website.

Leave a Comment